X Account Hack: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे X (Twitter) हँडल हॅक

Bhairav Diwase
चंद्रपूर:- काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विजय वडेट्टीवार यांचे अधिकृत X (ट्विटर) हँडल हॅक झाले असून, सध्या या अकाउंटवर सायबर हल्लेखोरांचे नियंत्रण असल्याचे स्पष्ट झाले आहे.


स्वतः विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात माहिती देत आपले अकाउंट हॅक झाल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या या अकाउंटवरून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या पोस्ट, मेसेज किंवा इतर कृतीशी माझा किंवा माझ्या कार्यालयाचा कोणताही संबंध नाही.


अकाउंट पूर्णपणे सुरक्षितपणे पुन्हा ताब्यात मिळेपर्यंत नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, या हॅक झालेल्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद लिंक (Links), मेसेज किंवा पोस्टवर विश्वास ठेवू नये आणि त्यावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा परस्पर संवाद साधू नये, अशी विनंतीही वडेट्टीवार यांनी केली आहे.