Chandrapur Police: गोवंश जनावर वाहतूक करणाऱ्या टोळीविरुद्ध चंद्रपूर पोलिसांची ६ महिन्यांत दुसऱ्यांदा 'मकोका' कारवाई!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- पोलीस स्टेशन घुग्घुस जिल्हा चंद्रपुर येथे अपराध क्रमांक २६९/२०२६ कलम ११ (१) (घ), (ङ), (च), (ज) प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतीबंध अधिनियम १९६० सहकलम ५(अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारीत २०१५) सहकलम ४९,३२५,१११ भारतीय व्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद झाला असुन गुन्हयात अटक आरोपी नामे १) ओमप्रकाश मुरलीधर कावळे वय ३८ वर्ष राह. यशोधरा नगर प्लॉट नं २८ नागपुर २) कलीम सईद मलीक वय ३३ वर्ष राह. कैलासपुर ता. सांगरपुर पोस्टे गागालेडी उत्तरप्रदेश ३) शाहरूख मोहम्मद अयुब मलीक वय ३० वर्ष राह. कैलासपुर ता. सांगरपुर पोस्टे गागालेडी उत्तरप्रदेश फरार आरोपी नामे ४) इरफान शेख राह. गडचांदुर ५) तौसीफ भाई निजाम अहमद राह. नागपुर ६) अरबाज कुरेशी राह. नागपुर यांचे ताब्यातुन ६५ नग गोवंश जनावरे, एम.एच १८ बी.जी ९४२५ टूक व जुने वापरते मोबाईल असे एकुण २७,८२,०००/-रू चा मुदद्दे‌माल पंचासमक्ष जप्त करण्यात आले मा. पोलीस महानिरिक्षक नागपुर परीक्षेत्र नागपुर यांची लेखी परवानगी अन्वये सदर गुन्हयात कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रन कायदा १९९९ अन्वये दिनांक ११/१०/२०२६ रोजी कलम वाढ करून मकोका कायदयान्वये सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे. 



महत्वपुर्ण कारवाई आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर प्रमोद चौगुले, पो.नि प्रकाश राऊत, सपोनी प्रफुल डाहुले, पोअं प्रसन्नजित डोर्लीकर ब.न २८२३ हे पोस्टे घुग्घुस करीत आहे.


त्याच प्रमाणे पोलीस स्टेशन रामनगर जिल्हा चंद्रपुर अपराध कांक ४४१/२०२६ कलम ११ (१) (d),११ (१) (k) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० सहकलम ५ (अ), ५ (ब),९,११ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ३२५,४९,३ (५), बीएनएस सहकलम ३(1) (ii), ३ (२), ३(४) मकोका १९९९ गुन्हयातील फरार टोळी प्रमुख व सदस्य आरोपी नागे १) ईमरान बब्बु शेख (ईमराण कुरेशी) वय ३८ वर्ष राह. वार्डक ०४ नरेश टॉकीज जवळ गडचांदुर ता. कोरपणा जि. चंद्रपुर २) सादीक खान नवाब खान (सादीक कुरेशी) वय ३९ वर्ष राह. वार्ड क ०४ अमलनाला रोड एरीगेशन कॉलणी गडचांदुर ता. कोरपणा जिल्हा चंद्रपुर ३) वसीम रज्जाक कुरेशी वय ३३ वर्ष राह. बबलु किराणा जवळ रयतवारी कॉलरी चंद्रपुर ४) सोहेल शेख अहमद शेख वय २३ वर्ष राह. महागांव २ ७५/१ यांकडी पोस्ट बाम्बरा जिल्हा कोमरामभिम (तेलंगाणा) ५) निजाम हमिद शेख (आवेश कुरेशी) राह. वार्ड क ०४ लक्ष्मी टॉकीज पाठी मागे गडवांदुर ता. कोरपणा जिल्हा. चंद्रपुर हे गुन्हा दाखल तरखेपासुन जानीवपुर्वक स्वतःचे अस्तीत्व लपवुन फरार झाले आहे. मा. न्यायालयाने टोळी प्रमुख व सदस्य याना हजर राहणेबाबत घोषनापत्र जाहीर केले असुन त्याचे चल-अचल संपत्तीची जप्ती कार्यवाही करणे चालु आहे. 


सदरची महत्वपुर्ण कारवाई मा. श्री. आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श्री प्रमोद चौगुले, पोउपनि राजेश चुंचुवार, पोउपनि सतीश पाटील, पोहवा प्रतीक शेंडे बं.न २२९८, पोहवा अनिल जमकातन ब.न १५७१, मपोहवा पतीता गिरसावडे बं.न २४७०, मपोहवा सपना साखरे बं. न २४७५, पोअं देविदास राठोड ब.न ४२८ हे करीत आहे.