Chandrapur police: चंद्रपूर शहर पोलिसांचा DJ विरोधात ॲक्शन मोडवर; बोलेरो पिकअपसह DJ साहित्य जप्त

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर शहरात DJ चालक आणि आयोजकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह DJ चे साहित्य असा एकूण ९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी DJ चालक आणि आयोजकांविरोधात कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २ वाजून २३ मिनिटांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अपराध क्रमांक १०२५/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम २२३, ३८ आणि १३६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईदरम्यान MH34 BG 0516 क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन आणि DJ चे साहित्य असा एकूण ९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.