Graduate Constituency Election : 38 उमेदवारांची मतपत्रिका, छोट्या मतपेटीवरून मुनगंटीवारांचा संताप

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपुरात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महायुतीचे समन्वयक म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. यावेळी भाजपच्या विकासकामांना मतदारांची साथ मिळेल आणि भाजप पुन्हा आपला बालेकिल्ला काबीज करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आचारसंहितेमुळे दुष्काळी प्रश्नांवर बैठक घेता येत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, 38 उमेदवारांचा समावेश असलेली मोठी मतपत्रिका छोट्या मतपेटीत टाकताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मतपत्रिका मतपेटीत टाकताना चुकून फाटल्यास ती अवैध ठरवू नये, अशी मागणीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.


आता पदवीधर मतदारसंघात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो आणि मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मतपत्रिका व मतपेटीच्या मुद्द्यावर निवडणूक यंत्रणा काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.