Pombhurna News : चेक आष्टा शेतशिवारात वाघिणीचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाची गस्त!

Bhairav Diwase

पोंभुर्णा:-
पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून वाघिणीचे दर्शन होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू असून, वाघिणीच्या वावरामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. विशेषतः कापूस वेचणी करताना वाघिणीच्या हल्ल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

दरम्यान, या घटनेची दखल घेत वनविभागाने परिसरात गस्त वाढवली आहे. मात्र, वाघिणीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने तातडीने योग्य उपाययोजना करून वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.