कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, एकच महिला दोन मशिवर करत होती काम.
Bhairav Diwase. July 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमुर:- चिमूर येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या चिमूर काटन इंडस्ट्री कापूस जिनिंग व प्रेसिंग युनिटच्या आईल बनवण्याच्या कारखान्यात सरकी पासून आईल तयार करण्याच्या एक्सलेटर मध्ये मंदा राजू सहारे वय 35 वर्ष रा .आझाद वॉर्ड चिमूर या कामगार मजूर महिलेचा मशीन मध्ये हात दबून हात तुटला व ती पडल्याने गंभीररित्या जखमी झाल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे भरती केले प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता नागपूरला पाठविण्यात आले सदर महिला दोन मशीन वर एकटीच काम करत असल्याने अपघात घडल्याची माहिती घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पोलीस चौकशीत पुढे आली आहे त्यामुळे कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात येऊन पूर्ण उपचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे .
चिमूर एमआयडीसीमध्ये चिमूर काटन इंडस्ट्री कापूस जिनिंग व प्रेसिंग युनिट असून या कापूस जिनिंग युनिटच्या सरकी पासून आईल तयार करण्याच्या एक युनिट एका साईडला असून त्यात सरकी पासून तेल बनविण्याची ॲटोमॅटीक ६ सयंत्र असून सरकी वाहून नेणे ,आईल बनवणे हे सर्व यंत्र काम मशनरी द्वारे होत असताना वरून पडणारी सरकी व इतर साहित्य ते मशीन मध्ये सरकविण्याकरिता महिला मजूर म्हणून मंदा राजू सहारे वय 35 वर्ष रा .आझाद वॉर्ड चिमूर इतर काही महिला या ठिकाणी गेल्या तीन-चार वर्षांपासून कामाला आहेत आज शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सरकी पासून फाईल बनवण्याचे मशीनवर काम करीत असताना दुपारी साडेचार वाजता चे दरम्यान या युनिटच्या सयंत्र पैकी तीन व चार क्रमांकाच्या यंत्रावर (तेलघाणीवर)एक महिला मशीनवर सरकी पुढे सर्कविण्याचं काम करीत होती त्यात तिचा हात मशीनमध्ये आल्याने त्या मशीन मध्ये हात पूर्णपणे खादयापासून कापले गेले त्यामुळे महिला महिला मंदा राजू साहारे खाली कोसळली किंकाळ्या आवाजाने बाजूला काम करणाऱ्या महिला येऊन धावल्या असता गंभीररीत्या जखमी अवस्थेत आढळून आली नंतर सदर महिलेला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र परिस्थिती गँभिर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले .
सदर अपघाताची माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून मोकाकचौकशी केली असता एक हात खांद्यापासून पूर्णतः तुटटलेला आठळून आला असुन तपास चिमूर पोलीस करीत असून सदर महिलेचा हात पूर्णतः तुटल्याने व गंभीर जखमी असल्याने सदर महिलेला आर्थिक नुकसान भरपाई व मोफत उपचार व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी परिवारांनी केली आहे तसेच कामगारांच्या सुरक्षा विषयक बाबीचा व्यवस्थापकडून पूर्तता होत होती का हाही प्रश्न ऐरणीवर आला आहे .