महाराष्ट्र शासनाकडून कुस्तीगीरांचे मानधन प्राप्त. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घेण्याचे आवाहन

Bhairav Diwase

संबंधित खेळाडूंनी त्यांचे मानधन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी केले.
Bhairav Diwase.    July 10, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
सन 2019-20 या वर्षात कुस्ती कलेचा विकास मानधन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मार्फत आयोजित अधिवेशनात गादी व माती विभाग (पुरुष) कुमार कुस्तीगीर प्राविण्य प्राप्त व सहभागी झालेले तसेच महिला कुस्तीगीर प्राविण्य प्राप्त कुस्तीगीरांना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत कुस्तीगीरांना मानधन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे प्राप्त झाले आहे. तरी संबंधित खेळाडूंनी त्यांचे मानधन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी केले आहे.

ही आहेत कुस्तीगीरांची नावे:

उमेश यादव, विजय कुहाटीवाले, सादर भेदोडकर,शुभम मोगरे, मयुर चोले, सुवेर मंडल, विजय रेंदले, इम्रान तिहाले, हिमायु अली, राजू कल्ला, अंकुश राखडे, अतुल सज्जनवार, अमोल राऊत, चेतन वाणी, अश्विन खनके, अमोर डेंगरी, विनित मिश्रा, ओम सिंग या कुस्तीगिरांचे 6 हजार रुपये मानधन आलेले आहे.

रोहन दंडेले, सुयश धास, यश शेंडे, संग्राम कणसे, मोहित दंडेले या कुस्तीगीरांचे 3 हजार 600 रुपये मानधन आलेले आहे.