Bhairav Diwase. Aug 09, 2020
(संग्रहित चित्र)
बल्लारपूर:- चंद्रपूर येथे बल्लारशा मार्गे चांदफोर्ट रेल्वे मार्गावर जात असलेल्या मालगाडीच्या खाली येऊन इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.मोतीराम दुर्गम असे ६० वर्षीय मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोतीराम हा काही दिवसापासून आपले मानसिक संतुलन हिरावून बसला होता.अशातच त्याने आज बाबुपेठ रेल्वे स्टेशन च्या रेल्वे लाईन वरून जाणाऱ्या माल गाडीच्या खाली येऊन त्याने आत्महत्या केली.या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शव ताब्यात घेतले. पुढील तपास सुरु आहे.