महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त “पुरोगामी पत्रकार संघाच्या” जिवती तालुका कार्यध्यक्ष पदी- रुग्णसेवक जिवन तोगरे यांची निवड.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
जिवती:- महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या जिवती तालुका कार्यध्यक्ष पदी रुग्णसेवक जिवन तोगरे यांची नियुक्ती पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र दादा सोनारकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.रुग्णसेवक जिवन तोगरे हे दैनिक महासागर या पेपरला व माझं गाव माझं चंद्रपूर you tube या चैनल न्युज साठी काम करीत आहे,आणि ते करीत असतांना सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असल्याने रुग्णसेवक जिवन तोगरे यांची जिवती तालुका कार्यध्यक्ष पदी निवड झाल्याने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.