Top News

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षांची परीक्षा केंद्र बदलुन गृह जिल्हा परीक्षा केंद्रामधून अनुमती द्या:-आमदार बंटी भांगडीया.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष सतिश गवई यांचेकडे केली मागणी.
Bhairav Diwase. Aug 09, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दि.१३सप्टेंबर २०२०पूर्व परीक्षा,संयुक्त गट व पूर्व परीक्षा दी.११आक्टो.२०२० यासाठी नोंदणीकृत परीक्षार्थ्यांना त्यांच्या गृह जिल्हा परीक्षा केंद्रामधून परीक्षा परीक्षा देण्यासाठी अनुमती देऊन त्यांचे परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांचेकडे केली आहे.

राज्य लोकसेवा आयोग अन्य स्पर्धा परीक्षा पूर्व तयारीसाठी विदर्भातील ग्रामीण भागातील बहुसंख्य परीक्षार्थी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे अभ्यासक्रम करतात आणी पुढे सदर ठिकाणच्या परिक्षा केंद्रावरून परीक्षा देतात विदर्भातील किमान २५ ते ५० हजार परीक्षार्थी कोविड १९ कोरोना परिस्थितीमुळे मुंबई,पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून नागपूरसह आप आपल्या गृह जिल्ह्यात निवासी आले आहेत अशा हजारोंच्या संख्येने विदर्भातील कानाकोपऱ्यात असलेल्या राज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या परीक्षार्थ्यांना त्यांच्या गृह जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रामधून परीक्षेसाठी लवकरात लवकर अनुमती मिळावी यासाठी फक्त जेमतेम ४०दिवस असा अत्यंत कमी अवधी शिल्लक असून राज्य आयोगाकडून सम्मानजनक कारवाई झाली नसल्याने राज्य लोकसेवा आयोगाद्वारे राज्य सेवेत येण्याची स्वप्न पाहणाऱ्या परीक्षार्थ्यांचे स्वप्न भंगण्याची स्थिती निर्माण झाली आहे.




यु.पी.एस.सी.,एन.ई. टी., एम.टि. ए.अशा विविध आयोग व केंद्र संस्थांकडून त्या-त्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रावरून परीक्षा देण्याची अनुमती दिलेली असतांना राज्य शासनाच्या अखत्यारीतील राज्य लोकसेवा आयोगाद्वारेच राज्यातील होतकरू परीक्षार्थ्यांचे शासन सेवेचे स्वप्न भंगत असल्याचे चित्र निर्माण होत आहे त्यामुळे असंतोशाची व उद्रेकाची स्थिती या कोरोना काळात झालेली आहे त्यामुळे यु.पी.एस.,सी.एन.ई. टी.,एन.टी. ए.याच धर्तीवर राज्य लोकसेवा आयोग परीक्षेसाठी नोंदणीकृत परीक्षार्थ्यांस त्यांच्या गृह जिल्हा परीक्षा केंद्रामधून परीक्षेसाठी बसण्याची अनुमती देण्यास परवानगी देण्याची मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटी)भांगडीया यांनी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांचेकडे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने