राजुरा तलावात सापडला मुलाचा मृतदेह आत्महत्या की हत्या? शहरात चर्चेला उधाण.

Bhairav Diwase
हत्या असल्याची राजुरा शहरात चर्चा योग्य तपास केल्यास सत्य येणार बाहेर.
Bhairav Diwase. Aug 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- आज दिन 08 आगस्ट रोजी राजुरा शहरातील नगरपालिका समोरील तलावात एका मुलाचा मृतदेह सापडला आहे.आदित्य तोटावार नाव असल्याचे समजते. हा मुलगा सोमनाथपूर वॉर्ड येथे वास्तव्यास होता अशी सूत्रांची माहिती आहे.या मुलाला काही मुलांनी मारहाण केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून ही हत्या की आत्महत्या हे पोलिसांनी योग्य तपास केल्यास सत्यता बाहेर येऊन यातील गुन्हेगार कोण?हे नक्कीच कळेल.