जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकूडे यांच्या प्रयत्नातून मंजूर गोवरी येथे 20 लक्ष रुपये निधीच्या कामाचे भूमिपजन.

Bhairav Diwase

गोवरी येथे सिमेंट काँक्रिट रोड, पेव्हर ब्लॉक, व बंद नाली च्या कामाचे एकत्र भूमिपूजन.

Bhairav Diwase. Aug 09, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा

राजुरा:- दि. ०७/०८/२० ला गोवारी येथे 20 लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. जी. प. कृषी व पशसंवर्धन सभापती श्री सुनिल उरकुडे यांच्या प्रयत्नातून गोवारी येथे वीस लक्ष निधी मंजूर करण्यात आला त्यात सिमेंट काँक्रिट रोड, पेव्हर ब्लॉक व बंद नाली च्या कामाचे भमिपुजन करण्यात आले आहे. covid 19 चा काळ असल्याकारणाने सुरक्षित अंतर ठेऊन साध्या पद्धतीने भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला. नेहमीच विकासाची कास असणारे नेते म्हणून सुनिल उरकुडे यांची ओळख आहे. गोवरी या गावात 20 लक्ष निधी मंजूर करवून आणल्याबद्दल गोवरी गावात ज्येष्ठ नागरिक तसेच संपूर्ण ग्रामवाशियांनी सुनिल उरकुडे यांचे आभार मानले.


या प्रसंगी उद्घाटक जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री सुनिल उरकुडे अध्यक्ष गोवरी येथील सरपंच सौ पौर्णिमा उरकूडे,प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच नागोबाजी लांडे, तुळशीराम मुके, महादेव कावळकर, मुख्याध्यापक सतीश कुळसंगे, अरुण आत्राम, वार्ताहर प्रकाश काळे आदींची उपस्थिती होती