Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी प.पूज्य शेषराव महाराज यांची पुण्यतिथी साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- संपूर्ण देशात दारू व्यसन मुक्तीची चळवळ उभारणारे प.पूज्य शेषराव महाराज यांची२० वी पुणयतिथी त्यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी याच तारखेला जिल्हा बुलडाणा, शिरपूर येथील महाराज्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत होते परंतु कोरोणा महामारीमूळे यावर्षीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

             दि.६/१०/२०२० मौजा सोणूर्ली तालुका राजुरा येथील व्यसन मुक्ती मार्गदर्शन व सस्तंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अनिल डोंगरे जिल्हा अध्यक्ष व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर तर प्रमुख पाहुणे श्री. लक्ष्मीकांत धानोरकर* जिल्हा उपाध्यक्ष.श्री.पंडित काळे. जिल्हा कोषाध्यक्ष. श्री.मंगेश गुरणुले उपसभापती प.स.राजुरा. हे होते.तसेच या कार्यक्रमा व्यतिरेख राजुरा तालुका चिचोली चंद्रपूर तालुका अजयपूर, सालेझरी गोंडपिपरी तालुका, आंजनगाव वरोरा तालुका इत्यादी गावातील प.पूज्य शेषराव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व सोशल डीस्टेगिंचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाला श्री. बालाजी बोरकुटे जिल्हा संघटक.श्री. दिगाबर वासेकर तालुका अध्यक्ष राजुरा श्री.प्रकाश अल्गमकर, श्री.आनंदराव सोणूर्ले, श्री.भिकाजी शेंडे, श्री.अनिल निरांजने, श्री.अविनाश राऊत, श्री.महादेव मांडवकर, श्री.नारायण खापने, श्री.अरुण बावणे यांनी विशेष परिश्रम घेतले.