Click Here...👇👇👇

आमदार कीर्तिकुमार(बंटीभाऊ) भांगडीया यांचे मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी चिमूर कडून महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध.

Bhairav Diwase

केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
Bhairav Diwase. Oct 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- भारताचे पंतप्रधान युगपुरुष श्री नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहीताचे केवळ अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाहीत तर यशस्वी करण्याचे कामही केले मोदी सरकारने संसदेतील दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांति घडविणारे पाऊल उचलले आहे मात्र शेतकऱ्यांबद्धल बेगडी प्रेम असणारी काँग्रेस आणी विरोधक अकारण कांगावा व अपप्रचार करून राजकारण करीत आहेत.
     या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणी दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची विक्री व बाजार पेठेत स्वतंत्र मिळणार आहे.शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ असणार आहे आपला शेतमाल कुठेही आणी योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मा.मोदींनी एम.एस.सी.कुठल्याही प्रकारे बंद होत नसल्यामुळे स्पष्टपणे सांगितले आहे या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे.नेहमीच शेतकऱ्यांबद्धल पुतण्या,मावशीचे प्रेम दाखवून शेतकऱ्यांना दिलेला मताचा अधिकार काढून घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील बेगडी नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारनी दिलेले शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती आदेश काढला आहे हा स्थगिती आदेश तातडीने रद्द करून केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महराष्ट्रा राज्यात अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे .या उद्देशाने भारतीय जनता पार्टी चिमूर यांच्यावतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
     चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी चिमूर यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामजी हटवादे,डॉ.देवनाथजी गंधारे,भाजपा नेते राजूभाऊ देवतळे,प्रवीण गणोरकर,पंचायत समिती सदस्य,पुंडलिकजी मत्ते,प्रदीपभाऊ कामडी,बकारामजी मालोदे,नगरसेवक संजय खाटीक,विजयजी झाडे,राजू बोडणे,विवेकजी कापसे,समीरभाऊ राचलवार,मनीषभाऊ तुंपल्लीवार,किशोरभाऊ मुंगले,रमेशजी कंचरलावार,प्रशांत चिडे,सचिनभाऊ फारकाडे,योगेशभाऊ नाकाडे,अरुणजी लोहकरे,शैलेंद्र पाटील,कलीम शेख,मायाताई नंनावरे,कल्यानीताई सातपुते,विकीभाऊ कोरेकर,विनोद भाऊ खेडकर, भारती गोडे,छायाताई कंचलावार,बाबाजी नांनावरे उपस्थित होते.