Top News

काल डोंगेघाटावर बुडून एकाचा मृत्यू.

शहरातील काही युवकांना मृतदेह पाण्यावर दिसला तरंगताना.
Bhairav Diwase.   Dec 01, 2020
ब्रम्हपुरी:- शहराला लागूनच असलेल्या चांदगाव रोडवरील डोंगेघाटावर बुडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि ३० नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आली प्राप्त माहिती नुसार मृतकाचे नाव संतोष पारधी (४५) असून ब्रम्हपुरी शहरातील देलनवाडी येथील रहिवासी आहे. मृतक दि. २७ नोव्हेंबर पासून घरून निघून गेला होता. तेव्हापासून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला परंतु आढळून आला नाही. 


           मात्र सोमवारी सकाळी डोंगेघाटावर त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना शहरातील काही युवक सकाळी डोंगेघाटावर पोहण्यासाठी गेले असता आढळून आला याची माहिती त्यांनी ब्रम्हपुरी पोलिसांना दिली काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून ओळख पटविली आणि शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खोब्रागडे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने