Top News

ना. नितीन गडकरी यांची लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयास सदिच्छा भेट.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- केंद्रिय सुक्ष्म,लघू उद्योग व परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी यांनी येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयाबद्दल आस्थेने चौकशी केली.

            दि.२१ जानेवारी रोजी येथील ग्रामोदय संघात केंद्र सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगाअंतर्गत स्फुर्ती योजनेच्या कारागिरांच्या सशक्तीकरणाबाबत चर्चा व प्रोत्साहन संबोधन करण्याकरीता आले असता त्यांनी लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार,शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.बतकी, उपप्राचार्य सुरेश परसावार, पर्यवेक्षक बी.एम.दरेकर, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.सचिन सरपटवार, माजी प्राचार्य गोपालराव ठेंगणे, सेवानिवृत्त शिक्षक डी.डी.मुनिश्वर आणि इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

                  यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी ना.नितीन गडकरी यांचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी गडकरी यांनी शिक्षक - विद्यार्थी यांच्याबद्दल औपचारिक चर्चा केली. यावेळी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमित गुंडावार, इम्रान खान यांनीही गडकरींचे शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने