Top News

शेतात विद्युत तारेला स्पर्श होऊन शेतमजुराचा मृत्यू.

Bhairav Diwase. Jan 22, 2021
चिमूर:- चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथून जवळच असलेल्या चिंचाळा कुणबी येथे शेतात विद्युत तारेला स्पर्श होऊन शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि. २१ ला सकाळी उजेडात आली.

    नामदेव चौधरी (३३) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. चिंचाळा (कु.) येथील मधुकर चौधरी यांच्या शेतकामावर नामदेव पुंडलिक चौधरी हा गडी (माणूस) म्हणून काम करीत होता. शेतात सध्या मिरची व चना हे पीक आहे. रानटी डुक्कर व इतर जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी मधुकर चौधरी यांनी विद्युत करंट लावला होता. गुरुवारी या तारेला स्पर्श झाल्याने नामदेव चौधरी याचा जागीच मृत्यू झाला.
    
   त्याच्यामागे सहा वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, आई व पत्नी असा परिवार आहे. भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज गभने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, विद्युत वितरण कंपनी शाखा अभियंता अमोद रंदये यांनी पंचनामा केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने