🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विहिरगाव ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा.

सरपंचपदी रामभाऊ देवईकर तर उपसरपंचपदी निळकंठ खेडेकर. 

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील मौजा विहिरगाव ग्रामपंचायत येथे आज पार पडलेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी रामभाऊ पंढरीनाथ देवईकर तर उपसरपंचपदी निळकंठ गोविंदा खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. येथे लिलाबाई तुकाराम भिवनकर, छाया बंडू मडावी, माधुरीताई विजय चिडे, पूजा सुरेश वाघमारे हे सदस्य निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. डी. पेटकर, कृषी विस्तार अधिकारी प स राजुरा यांनी काम पाहिले. येथे ९ पैकी काँग्रेसचे सर्वाधिक ६ सदस्य निवडून आले आहेत तर अन्य ३ सदस्य निवडून आले आहेत. 
             सर्व विजयी सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत स्तरावरील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी अभिनंदन केले आहे.