Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे भविष्य वेध कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase.  March 03, 2021
पोंभूर्णा:- स्थानिक चिंतामणी काॅलेज काॅमर्स, पोंभूर्णा येथे महिला दिनानिमित्त अंतर्गत तक्रार निवारण समिती तथा प्लेसमेंट सेल व करिअर गायडन्स समितीच्या मार्फत डमिटाॅलाॅजी फिक्स मल्टीपल इंटेलीजेंट टेस्ट च्या (डी एम आय टी) माध्यमातुन विद्यार्थ्यांची टेस्ट घेण्यात आली तथा यशस्वीततेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.


या परिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा आवडी, छंद, अवगत कौशल्ये इत्यादी बाबीचे अध्ययन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून अभियंता संदीप ढोबळे हे उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांना स्वतःचा इगल, पिकाॅल,आऊल, स्टेडी व्यक्तिमत्व पैकी कोणती आपली बौध्दिक क्षमता आदी परिक्षणाची गरज आहे असे व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनातुन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे शक्य आहे. सातत्य व संयमाचा माध्यमातुन यश मिळवणे सहज आहे असे ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शक प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी महिला सुरक्षीतते संदर्भांत महाविद्यालयात उपलब्ध प्रणालीची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. टि. एफ. गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांनी उद्योगी बनावे, संधी निर्माण करणारे बनावे, असे म्हणाले. डाॅ. संघपाल नारनवरे, ग्रंथपाल प्रा.विजय बुधे यांच्यासह डाॅ. शिला नरवाडे व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. आयोजक प्रा. डाॅ. पुर्णिमा मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कु. हर्षदा साखलवार तर आभार कु. रुपाली लोणारे हीने केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने