Top News

टेंभुरवाही जवळ भरधाव वाहनाची दुचाकीस्वाराला धडक; एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

भिमणी येथून शिर्शी येथे लग्नाला जात असतांना घडला अपघात.
Bhairav Diwase.     March 03, 2021
राजुरा:- राजुरा तालुक्यातील टेंभुरवाही या गावाजवळील रस्त्यावर  भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वारला धडक दिली त्यामुळे कौशिक इस्टाम वय अंदाजे 35 रा. भीमणी हा व्यक्ती जागीच ठार झाला व नितेश मडावी वय अंदाचे 30 रा. भीमणी हा व्यक्त गंभीर जखमी झाला.


    सदर घटना 3 मार्च रोज बुधवारला दुपारी 4:00 वाजताच्या सुमारास घडली असून दुचाकीस्वार हे पोंभुर्णा तालुक्यातील भिमणी या गावातील रहिवासी आहे. दोघेही व्यक्ती हे राजुरा तालुक्यातील शिर्शी या गावामध्ये लग्नाला जात असतांना टेंभुरवाही लगत रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली व पळून गेले. त्यामध्ये एका इसमाचा जागीच मृत्यू झाला व एक इसम हा गंभीर जखमी झाला. शिर्शी येथे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम लग्नाला जात होते. अपघाताची माहिती मिळताच भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम, दिनेश कोमरपलीवार, हितेश गाडगे घटनास्थळी पोहचून गंभीर झालेल्या युवकाला राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व या घटनेची पूर्ण माहिती पोलिसांना दिली. पुढील तपास सुरू असून घटनेची पूर्ण माहिती लवकरच आधार न्यूज नेटवर्क द्वारे आपणांस कळविण्यात येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने