बीड:- बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथील रोहित्राचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका युवकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला
अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच नवविवाहितेने संपविली जीवनयात्रा.
ट्रकची बसला धडक; चार प्रवासी गंभीर जखमी.
बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथील गणेश सुनिल तावरे (20) हा जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीजवळ गेला होता. वीज नसल्यामुळे तो रोहित्राजवळ जाऊन फ्यूज टाकण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक रोहित्राचा स्फोट झाला आणि या स्फोटात या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
रोहित्राला चिटकल्याने गणेश पूर्णपणे जळून खाक झाला होता. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. रोहित्राचा स्फोट कशामुळे झाला याचा शोध सुरू आहे.