कुरखेडा:- अंगावरची हळद अजून सुकलीही नसताना लग्नाच्या १८ व्या दिवशी नवविवाहितेेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सदर घटना रविवारी कुरखेडा तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांडूटोला येथे घडली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने तिच्या सासर व माहेरच्या गावात शोककळा पसरली आहे.
ट्रकची बसला धडक; चार प्रवासी गंभीर जखमी.
रोहित्राचा अचानक स्फोट, तरुणाचा होरपळून मृत्यू.
तालुका मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडेगाव गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट पांडूटोला येथील आदेश घाटघूमर या युवकाचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील तोमेश्वरी नामक मुलीशी २४ फेब्रुवारीला थाटामाटात लग्न झाले. लग्न होऊन ती सासरी आली. दोघेही जण आनंदातच हाेते.
शनिवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास तोमेश्वरीने आपल्या पतीला जेवू घातले व सोबत दुपारच्या जेवणाचा डबा करून दिला. डबा घेऊन आदेश शहरात इमारतीच्या रंगरंगोटीच्या कामावर निघून गेला. दरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तोमेश्वरीने विष प्राशन केले. तिच्या नाका तोंडातून फेस येत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिला वाचविण्यासाठी येथील डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली; परंतु तिच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. रात्री १२ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.