Top News

भद्रावती श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन उत्साहात साजरा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती ऐतिहासिक नगरीतील गजानन नगर मधिल श्री संत गजानन महाराज मंदिर येथे श्री संत गजानन महाराज यांचा 143 वा प्रगट दिन विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. 5 मार्च रोजी शुक्रवार ला सकाळी 5 वाजता श्री चा अभिषेक श्री भाके महाराज यांच्या वानितुन श॑कर बोटुवार व सौ. माया ताई बोटुवार या॑च्या शुभ हस्ते पार पडला.
              
              त्या न॑तर सामुदायिक ध्यान व श्री ची आरती झाली. सकाळी 7 वाजता श्री ची पालखी गजानन नगर मधुन काढण्यात आली त्या वेळी भाविकांनी श्री चे दर्शन घेतले. दुपारी 12 वाजता ह.भ.प. मेश्राम महाराज यांच्या प्रखर ओजस्वी वाणीतून गोपाल काल्याचे किर्तन पार पडले. त्या न॑तर श्री ची आरती, पसायदान, अहवाल वाचन गोड बुंदी चा प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
              
       कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमाकांतजी गु॑डावार, भाऊ राव ला॑जेकर,हिरामण कोटगले, ब॑डुजी दरेकर, विजय ड॑भारे,श॑कर बोटुवार, रमेश काळे, अनिल चटप, विनोद घोडे,चेतन गु॑डावार,तथा समस्त गजानन नगर वाशीया॑नी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने