Top News

जागतिक चिमणी दिनानिमित्य बालगोपाल कडून चिऊ ताईला पाणपोई भेट.

ओम बाल दुर्गाउस्तव मंडळा चा अनोखा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- ओम बाल दुर्गाउत्सव मंडळ वॉर्ड नंबर. ५ गडचांदूर यांच्या वतीने दि २०/३/२०२१ ‘जागतिक चिमणी दिन’ निमित्य चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. 'पासर डोमेस्टीकस' अर्थातच 'हाऊस स्पॅरो' ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे. जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या 26 पैकी फक्त 23 चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत.
चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झालीय. ओम बाल दुर्गाउत्सव मंडळा तर्फे जागतिक चिमणी दिन वॉर्ड नों ५ मध्ये सादरा केला  उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाण्याच्या पाण्याच्या बाटल्या प्रत्येक वृक्षाला लावण्यात आले. दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो. त्या वेळी  मंडळाचे संघटक महेश देरकर अभिषेक जोगी रवी भाऊ श्रीसागर विष्णू देरकर ब्रह्मा देरकर ऋषी चटप अंकुश नागभीडकर निशांत धांडे प्रितिष उलमाले सागर मसे परी' अवनी' अभि' रुद्रा' माही' चिकू'  मयूर' विशाल' हे उवक्रमार सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने