Top News

विद्युत शॉक लागल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू.

Bhairav Diwase.     March 17, 2021


बुलढाण:- बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांगरा येथे विद्युत खांबावर जंपअर जोडण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजताचे सुमारास घडली.

वाघाच्या हल्यात चेक आष्टा येथील इसम ठार.
👇👇👇👇👇👇

     प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नंदकिशोर श्रावण मांजरे यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून असे समजते की, मलकापूर पांग्रा येथील कृषीपंपाचा वीजपुरवठा रात्रीपासून खंडित झाला होता दरम्यान सदर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विजवितरण महा वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशांत अशोक देशमुख याने माझा भाऊ ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर श्रावन मांजरे यांना  शेतातील खांबावर जंपअर जोडण्यासाठी पाठवले तेवढ्यात विज पुरवठा सुरू झाला व  विश्वंभर ला जोरदार विजे चा धक्का  बसला व तो खांबावरच ठार झाला. दरम्यान विद्युत तंत्रज्ञ प्रशांत अशोक देशमुख हा फरार झाला. दरम्यान ग्रामस्थांनी तंत्रज्ञ देशमुख व हेल्पर सोनपसारे यास तातडीने अटक करावी अशी मागणी केली  दरम्यान घटनास्थळी ठाणेदार जितेंद्र आडोळे, दुय्यम ठाणेदार दीपक राणे, जमादार नारायण गीते, बिबीचे ठाणेदार एल डी तावरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत  घालत वातावरण निवळले दरम्यान ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी आरोपी देशमुख यास ताब्यात घेऊन अटक केली असून त्याचेवर 304 अन्वये गुन्हा खल केला आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार दीपक राणे हे करीत आहेत.

मृतक विश्वंभर मांजरे हे त्या भागातील विज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे आग्रहास्तव खांबावर काम करण्यास गेले होते. घटनास्थळी मी हजर नव्हतो मला फोनवर लोडशेडिंग बद्दल विचारणा करण्यात आली होती सदर ठिकाणी लोडशेडिंग होते मात्र क्रॉसिंग झाल्याने ही घटना घडली. 
प्रशांत देशमुख 
वीज तंत्रज्ञ मलकापूर पांगरा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने