Top News

मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल थेट शेतात.

डोक्याला जबर मार लागल्याने चालकाचा जागीच मृत्यू.

Bhairav Diwase. March 18, 2021

सिंदेवाही:- आज सकाळी ९ वाजता अजय गोपाल पेंदाम वय 23 रा. शेलदा ता. ब्रह्मपुरी हा व्यक्ती कटिंग करायला त्याच्या स्वतःच्या हिरो होंडा लिवो कंपनीचे मोटरसायकल क्रमांक एम एच ३४ बीसी ७४२४ ने सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावा कडे  जात असता सकाळी १० वा. सुमारास पवनपार -टेकरी टर्निंगमार्ग रोडवरील मोटरसायकल भरधाव वेगात असल्याने  कंट्रोल न झाल्याने रोडच्या बाजूस असलेल्या शेतात नेऊन शेतातील बांच्या पारीला जाऊन मोटरसायकल जोरदार धडक दिल्यामुळे अजय पेंदाम याचा डोक्याला जबर मार लागून तो जागीच मृत्यू झाला. 

जवान निखिल बुरांडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

हि घटना सिंदेवाही पोलीस स्टेशन ला माहिती होताच लगेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. अपघात झालेल्या मृतकाचे  शव ताब्यात घेत उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय सिंदेवाही येथे नेले व सिंदेवाही पोलिसांनी स्टेशन नोंद करत अप. क्र. ८३/२०२१ भारतीय दंड विधानानुसार कलम ३०४ दाखल केला आहे. व पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने