रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी कोरोना या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी लस काढण्यात यशस्वी झाले. कोरोना लसीकरणाला संपूर्ण भारतभर सुरुवात झाली. सध्या ४५ ते ६० वर्ष वयोगटातील सर्वांना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. अश्यातच जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे भेट दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील २ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचारी अनुपस्थित होते. कोरोना लसीकरणाला प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे प्रचंड सुरूवात झाली असून जवळपास ६०० लस प्राथमिक आरोग्य केन्द्र पाटण येथे आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाल्या. मिळालेल्या लसीमधून सर्वच लसीकरण झालेले आहे.
तसेच आजच्या तारखेला एकही लस उपलब्ध नव्हती. जिल्हा स्तरावर यासाठी मागणी करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. तसेच रुग्णालयात एकही रुग्ण भरती नव्हता. रुग्णालयातील संपूर्ण परिसर सॅनिटायजर करून स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी श्रीमती शेडमाके व एएनएम श्रीमती टेकाम उपस्थित होते.