महाराष्ट्र श्री आणि मिस्टर इंडिया स्पर्धा जिंकलेला मराठमोळा शरीरसौष्ठवपटू जगदीश लाडचे कोरोनाने निधन.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. April 30, 2021
मुंबई:- मुंबईसह संपुर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना आपल्याला दिसत आहे. शारीरिकदृष्ट्या फिट समजल्या जाणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंना देखील याचा फटका बसताना दिसत आहे. मराठमोळा शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड याचे कोरोनाने निधन झाले. तो अवघ्या ३४ वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्याने शरीरसौष्ठव वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जगदीशने महाराष्ट्र श्री. स्पर्धेत तब्बल चार वेळा सुवर्ण कामगिरी केली तर, मिस्टर इंडिया या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याने दोन वेळा सुवर्णपदक मिळवले. तर, जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य आणि कांस्यपदक आपल्या नावे केले. कमी वयातचे त्याने शरीरसौष्ठव क्षेत्रात चांगले नाव कमवले. तसेच त्याने नवी मुंबई महापौर श्री स्पर्धेचा किताब देखील मिळवला होता. जगदीशने बडोदा येथे स्वतःची जिम सुरू केली होती आणि तो त्यासाठी काही दिवस बडोद्याला स्थायिक झाला होता. तिथेच त्याचे निधन झाले.