जूनगावात गुंडांचा थरार; संपूर्ण गाव भयभीत.
पोंभुर्णा:- पोलीस ठाणे मुल तहसील पोंभुर्णा अंतर्गत येत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील जुनगाव येथे आज दिनांक 31 मे 2019 रोजी भाड्याने आणलेल्या गुंडांनी जणू उच्छाद मांडला. या प्रकारामुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. तलवार आणि पिस्तोल दाखवत गावकऱ्यांचा दहशत आणि भीती निर्माण करून एका निरपराध शेतकऱ्याचा पाठलाग करून त्यालाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुणांकडे शास्त्र पाहून गावातील नागरिक पुढे कोणीही धजावत नव्हते.
दरम्यान येथीलच कुणीतरी एकाने पोलिसांना ही माहिती दिल्यावरून बेंबाळ पोलीस चौकीचे पोलीस पथक जुनगाव येथे दाखल होताच या गावगुंडांची पार भंबेरी उडाली. व ते इकडे तिकडे पळू लागले. मात्र नागरिकांच्या मदतीने या भाडोत्री गुंडांना पकडण्यात यश आले.
विलास रघुनाथ भाकरे यांचेवर जादूटोणा केल्याचा संशय निर्माण करून त्यांच्याच नातेवाईकाने सावली तालुक्यातील कवठी येथून भाडोत्री गुंड बोलाविले होते. या गुंडांच्या हातात तलवार आणि पिस्तोल दिसताच नागरिकांचे होश ठिकाणी लागले. विलास भाकरे पळून जाऊन इतरांच्या घरात आसरा घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला असला तरी तो गंभीर जखमी आहे.
दरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सर्व साहित्य दुचाकी वाहनासह जप्त करून सर्वांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठावरे व त्यांचे सहकारी करीत आहेत.