Top News

महिलांची पाण्यासाठी घुग्घुस न.प. कार्यालयात धडक.

बहिरमबाबा नगरच्या महिलांचा प्रशासना विरुद्ध संताप.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
घुग्घुस:- सोमवार 31 मे रोजी सकाळी दरम्यान घुग्घुस येथील बहिरमबाबा नगर वार्ड क्रमांक सहाच्या महिलांनी घुग्घुस नगरपरिषदेच्या कार्यालयात पाण्यासाठी धडक दिली व प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त केला.
ही माहिती मिळताच भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांनी जमलेल्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि वेकोली व्यवस्थापन व न.प. प्रशासनाशी संपर्क साधून बहिरमबाबा नगर येथे पाण्याचे टँकर पाठविण्यास सांगितले.
उन्हाळा सुरु असल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. घुग्घुस येथील बहिरमबाबा नगर वार्ड क्रमांक सहा हनुमान मंदिरा जवळील जवळपास 30 नळ धारकांच्या नळाला पाणी कमी येते त्यामुळे पाण्यासाठी येथील महिलांना वणवण भटकावे लागते.
यासाठी येथील पाईप लाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदन देतांना सुशीला बरडे,शारदा भरणे, अंजली ठाकरे किरण रंगारी, नूतन पडवेकर, सुजाता रंगारी, रमाबाई पडवेकर, माधुरी भोंगळे, वंदना तिवारी, नीलिमा निचकोला, ममता रईदास, अनिल बोबडे, मधुकर धांडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने