Click Here...👇👇👇

भाजयुमो जिल्हा चंद्रपूर (महानगर) तर्फे सेवाभावी संस्थानाचा सत्कार.

Bhairav Diwase
कोरोना संकट काळात सेवाभावी कार्य करणारे समाजसेवकानची कामगिरी हे अभिमानास्पद- विशाल निंबाळकर जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार चे ७ वर्षे यशस्वी पणे कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर महानगर च्या वतीने कोरोना काळातील शासकीय व खासगी रुग्णालयातील रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण व नाश्त्याची सुविधा करून देणाऱ्या काही समाज सेवी संस्थांचा आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय प्रांगणात N-95 मास्क, सॅनिटीझर व vapourizer मशीन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्या वेळी भाजयुमो चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी समाजसेवी संस्थांच्या कार्याची प्रशंसा केली व ही सेवा अविरतपणे सुरू ठेवावी असे आव्हान केले. केंद्र सरकारच्या सप्त वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महानगरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिली.


सदर कार्यक्रमात गणेश रामगुंडावार, विपीन येंगलवार, महेश मंचलवार, आशिष अलचावार, धीरज पाटील, महेंद्र कासरलेवार, रोहित कुंकूनटलावार, रमेश कोंडबत्तूनवार, जय निखारे, सुशील पटले, सुभाष वालदे, सुमित आंबटवार यांचा सत्कार करण्यात आला.
     सदर कार्यक्रमास भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो महामंत्री प्रज्वलनंत कडू, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष यश बांगडे, कुणाल गुंडावार, स्नेहीत लांजेवार, बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष संजय पटले, बाबूपेठ मंडळ महामंत्री विवेक शेंडे, सुशांत आक्केवार हे उपस्थित होते.