Top News

तेलंगणातील धबधब्यावर राजुरा तालुक्यातील युवक गेला वाहून. #Death #rajura


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा:- पावसाळा म्हणजे पर्यटनाचा हंगाम त्यातल्यात्यात धबधबा, डोंगर, बांध, धरणे (डॅम) इत्यादी ठिकाणी तरुणाईचा जल्लोष असतो. लोणावळा, खंडाळा, चिखलदरा ही ठिकाणे तर जगप्रसिद्ध आहेतच त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पावसाळ्यात खळाळून वाहणारे आणि स्वतःला उंचावरून खोल दरीत कोसळून घेणारे धबधबे तर आपल्या अप्रतिम सौंदर्याने पर्यटकांना मोहित करतात आणि त्यामुळेच अशा ठिकाणी पर्यटकांची पाऊले आपोआप वळतात.  #Death #rajura 
🍾दारूच्या नशेत युवकाने स्वतःच्या कारने दिली दुसऱ्या कारला जोरदार धडक.

🌳🚗झाड पडले डॉ. पत्रीवार यांच्या कारवर.
मात्र बरेचदा बेभान अथवा बेफाम तरुणाई उन्मुक्त होऊन नको ते धाडस करते आणि स्वतःचा घात करून घेते. ज्यामुळे कित्येक तरुणांना प्राणास मुकावे लागण्याच्या घटना दरवर्षी घडतात मात्र हे माहिती असुनही तरुणाईची रग आपला रंग दाखवत असते.
 
🔫पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपीला 48 तासांच्या आत अटक.

⛔चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांची गळफास घेत आत्महत्या.
असाच काहीसा प्रकार तेलंगणातील आसीफाबाद जिल्हा मुख्यालयापासुन जवळपास 25 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या तिरयानी येथील धबधब्यावर घडला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सुटीचा दिवस संततधार सुरू असलेला पाऊस ह्यामुळे निसर्गरम्य धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी राजुरा तालुक्यातील देवाडा येथील रामकीसन विजय लोहबळे , हर्षल निकोडे, सुरज हरणधरे, राजकुमार छोले, साहिल मेश्राम आणि काही युवक खाजगी वाहनाने गेले होतेे.
खळखळत्या धबधब्याला बघुन सळसळते रक्त उसळून आले नाही तर नवलच आणि नेमका ह्याच वेळी बेभान तरुणाई नको ते धाडस करते असेच काहीसे ह्यापैकी काही युवकांनी केल्याची चर्चा असुन ह्या युवकांनी उंचावरून धबधब्यात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ह्यातील काही युवक पाण्यात वाहू लागले. त्यापैकी दोन युवक किनार्‍यावर येण्यात यशस्वी झाले मात्र 19 वर्षीय रामकिसन लोहबळे मात्र प्रवाहात वाहुन गेल्याचे कळले आहे. 
ही वार्ता देवाडा येथे पोहोचताच खळबळ उडाली असून काही दिवसांपूर्वीच ह्याच गावातील 3 लोकांना नाल्यात ट्रॅक्टर उलटल्याने जलसमाधी मिळाली होती. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तो आजची घटना घडल्याने देवाडा येथे शोककळा पसरली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच तिथे गेलेल्या सर्व युवकांच्या नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली असून वृत्त लिहीत पर्यंत त्या युवकाचा शोध लागला नव्हता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने