Top News

पिट्टिगुडा येथिल पीडित कुटुंबियांना १० लाखांची आर्थीक मदत द्या. #Help

विदर्भ राज्य आंदोलन समितीकडुन विद्युत विभागाला निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भाग पिटीगुडा नं.२ या गावातील २८ वर्षीय युवकाचा विजेच्या खांब्याला स्पर्श लागून मृत्यू झाला पिटीगुडा येथील ग्रामवासीयांनी विद्युत मंडळाला कोसळत असलेल्या विद्यूत खांब बद्दल आवेदन देऊन ही विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. या कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण मुलाला आपले प्राण गमवावे लागले.
 ही घटना २०/०८/२०२१ ला झाली असून तब्बल २४ तास लोटून ही भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असतानाही कोणत्याही कर्मचार्यांनि या पीडित कुटुंबाला भेट दिली नाही या गैरजीमेदार आळशी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यामुळे या मुलाला आपला जीव गमवावा लागला असा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी पोलीस पंचनामाच्या वेळी केला आहे. तरी पीडित कुटुंबियांना तातडीने १० लाख रुपयांची मदत करावी . अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र विद्युत मंडळ यांना केली आहे.#Adharnewsnetwork
निवेदन देताना विशाल राठोड सोशल मीडिया प्रमुख चंद्रपूर, विनोद पवार युवा आघाडी शहर अध्यक्ष जिवती, सुनील राठोड वि रा आ स तालुका अध्यक्ष जिवती, अरविंद चव्हाण युवा आघाडी अध्यक्ष जिवती, प्रवीण राठोड व विदर्भ राज्य आंदोलन समिती जिवती उपस्थित होते.#Help

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने