🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व्हर झाला होता डाऊन! #serverdown

नेमके कारण अस्पष्ट, मेसेज पाठवण्यास नेटकऱ्यांना अडचणी.
जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व्हर डाऊन झालं आहे. युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी येत आहेत. व्हॉट्सअ‌ॅप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. खुप वेळा पासुन व्हॉट्सअ‌ॅप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व्हर डाऊन झाले होते.
सर्व्हर अचानकपणे बंद, कारण अद्याप अस्पष्ट....

जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे मागील वीस मिनिटांपासून जाणवत आहे. व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.
फेसबुक, मेसेंजरही बंद, नेमक्या अडचणी काय?

व्हॉट्सॲपला नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नाहीयेत. त्याचबरोबर व्हाट्सअॅप स्टेटसही अपलोड होण्यास अडचण येत आहे. तर दुसरीकडे फेसबुक तसेच फेसुकच्या मालकीचे असलेले मेसेजिंग ॲप मेसेंजरसुद्धा डाऊन झाले आहे. कोणतेही संदेश जात किंवा येत नाहीयेत. संदेश वहनास अडचणी येत असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे ही अडचण नेमकी का येतेय, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. इन्स्टाग्रामचीही तीच स्थिती आहे.

व्हॉट्सॲप आणि फेसबुक ट्विटरवर नेमकं काय म्हणाले?

“काही लोकांना व्हॉट्सॲप वापरताना अडचणी येत आहेत, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आम्ही ही तांत्रिक अडचण दूर करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच व्हॉट्सॲप पुन्हा आधीसारखं नॉर्मल सुरु होईल. त्याबाबतची माहिती लवकरच आम्ही तुला कळवू. आपल्या संयमाबद्दल धन्यवाद”, असं फेसबुक आणि व्हॉट्सॲप टीमने ट्विटरवर सांगितलं आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत