दरोडेखोरांकडून १५ तासांत पावणेदोन कोटी जप्त. #Arrested

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- अरविंदनगरात नाजनीन हारून कोळसावाला यांच्या कुटुंबाला नकली पिस्तूलीचा धाक दाखवून १७ नोव्हेंबर रोजी दारोडा टाकणाऱ्या टोळीतील तिघांकडून रामनगर गुन्हे शाखेच्या पथकाने चक्क १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम व चोरीत वापरलेल्या दोन कार ताब्यात घेतल्या.
इम्रान इमान शेख (२९), शाहाबाज जबीउल्ला बेग (२९) रा. राजुरा, शुभम उर्फ मायाभाई नामदेव दाचेवार (२७)रा. मुंडाळा ता. सावली असे अटकेतील चोरट्याचे नाव आहेत.
नाजनीन कोळसावाला यांच्या भावाच्या बेडरूमधील पलंगाच्या खाली १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम एका थैल्यात भरून ठेवली होती. बुधवारी दु ४. ४५ वा. त्यांची आई व सासू घरी होत्या.
दरम्यान, पाच अनोळखी इसमांनी सासूचे तोंड दाबून नकली पिस्तूलीचा धाक दाखवून रोख रकमेच्या चार थैल्या हिसकावून पांढऱ्या रंगाच्या कारने पळून गेले. कोळसावाला यांच्या तक्रारीवरून रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून ठाणेदार मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे एपीआय हर्षल एकरे व पथकाने संशयावरून नागपूरला रवाना झाले. शिवाय, बल्लारपूर व राजुरा येथील चोरीच्या गुन्ह्यांत वापरलेले वाहन शोधण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व पथकाला पाठविण्यात आले.
सायबर सेलच्या मदतीने नागपुरातून दोघांना अटक केली. त्यांनी दरोड्याची कबुली केली. चोरट्यांकडून १ कोटी ७३ लाख ५० रोख जप्त केले. याशिवाय पळून जाण्यासाठी एमएच बीई ० ७१ आणि चोरीसाठी वापरलेली एमएच ३३ व्ही ५९९९ क्रमांक अशी दोन वाहने, नकली पिस्तूल व चाकू जप्त केले. अटकेसाठी ठाणेदार मधुकर गिते, एपीआय एकरे, विनोद भरले व पथकाने कामगिरी केली.

1 टिप्पणी: