वाघाच्या हल्यात खरमत येथील शेतकरी जखमी #Pombhurna #tigerattack

Bhairav Diwase
आठवड्यातील चौथी घटना
पोंभुर्णा:- पोंभूर्ण्यात वाघाची दहशत कायम असून आठवडाभरात वाघाने कहर माजवला आहे. कोठारी वनपरिक्षेत्रातील बेर्डी शेतशिवारातील आपल्या शेतात कापूस वेचणी व शेतीचे काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी ३ वाजताच्या सुमारास घडली. केशव भिवाजी रामटेके वय ६० वर्षे असे जखमी शेतकऱ्याचे नाव असुन तो पोंभूर्णा तालुक्यातील खरमत येथील रहिवासी आहे.
सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे. कापूस वेचणी व धान चुरण्याचे काम जोमाने सुरू आहे. आज दुपारी केशव रामटेके आपल्या शेतात शेतीचे काम करीत होता. शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून रामटेके यांना जखमी केले. बाजूला त्याचा मुलगा व शेतमजूर असल्याने त्यांनी आरडाओरडा केला त्यामुळे तो थोडक्यात बचावला. लगेच त्याला वैद्यकीय उपचारासाठी पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहे.