जाहिरात... Advertisement... विज्ञापन

हिवाळी अधिवेशनात "या" १२ खासदारांचं निलंबन #Wintersession

सीपीएम, सीपीआय, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश
नवी दिल्ली:- संसदेच हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मात्र, या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आधीपासूनच होते. मात्र, आता राज्यसभेच्या बारा खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.
राज्यसभेत गोंधळ केल्याच्या कारणावरून ही कडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सीपीएम आणि सीपीआयचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे खासदार आहेत. या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या खासदारांचा समावेश आहे. प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, अखिलेश प्रताप सिंग यांचा समावेश आहे. सभागृहाचे कामकाज उद्या, ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. या खासदारांचं हे निलंबन चालू सत्राच्या उर्वरित भागासाठी करण्यात आलं आहे.

सीपीएम:- एलामाराम करीम

काँग्रेस:- फुलो देवी नेताम, छाया वर्मा, आर बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासीर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग

सीपीआय:- बिनॉय विस्वम

तृणमूल काँग्रेस:- डोला सेन आणि शांता छेत्री

शिवसेना:- प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत