Top News

भ्रष्टाचार विरोधी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी मनोज पोतराजे तर जिल्हा संयोजक पदी अभि वांढरे यांची निवड. #Selection


चंद्रपूर :- सध्या देशासमोर भ्रष्टाचार हे मोठे आव्हान असून त्याला सामोरे जाण्यासाठी तरुण पिढीला संघटित व्हावे लागेल. यासाठी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा स्थापन करून तरुण, विचारवंत, समाजसेवक आणि प्रबुद्ध नागरिकांसाठी व्यासपीठ तयार केले आहे. याला पेरीत होऊन अनेक युवक भ्रष्टाचार विरोधी मोर्चा मध्ये सहभागी होत आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी मोर्चाला संघटित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष राहुल गंगावणे यांनी आज भ्रष्ट्राचार विरोधी मोर्चाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मनोज पोतराजे तर जिल्हा संयोजक पदी अभि वांढरे यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता संदीप दुबे व राष्ट्रीय सरचिटणीस तथा सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता इंजिनीयर.चंद्रकांत त्यागी यांच्या सूचनेवरून करण्यात आली आहे.
या नियुक्तीने चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी मोर्चा मजबूत होईल, असे मत प्रदेशध्यक्ष राहुल गंगावणे यांनी व्यक्त केले. ते समोर म्हणाले की, नवी दिल्लीत गेल्या 10 वर्षां पासून भ्रष्टाचारविरोधी मोर्चा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा देत असून यात सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांसह देशभरातील वकिलांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे असे मत भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे प्रदेशध्यक्ष राहुल गंगावणे यांनी व्यक्त केले. भ्रष्ट्राचार विरोधी मोर्चाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मनोज पोतराजे व जिल्हा संयोजक पदी अभि वांढरे यांच्या नियुक्ती नंतर आशिष ताजने, साहिल कांबळे, शुभम गेडाम, सत्यम रामटेके, पंकज गेडाम, शुभम अडबले, निखिल मोहिंकर रोहित खोब्रागडे, तुषार येरमे, यांच्या सह सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने