Top News

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या.#Suicide



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील सिंधी येथील शेतकरी सोमा मल्ला दामेलवार वय वर्ष ६१ याने स्वतः च्या सर्वे नंबर २६६ मध्ये दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ रोजी सततच्या नापिकी ला कंटाळून नैराश्यातून आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले.
सदर घटनेची माहिती मुलगा राजकुमार दामेलवार याला झाली. त्याने काही स्थानिक नागरिकांची मदत घेऊन ताबडतोब सरकारी दवाखाना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दिनांक ८ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता सोमा दामेलवार यांचे दुःखद निधन झाले.
त्याचेवर बँक ऑफ इंडिया विहिरगाव आणि सीडीसीसी बँक विरूर स्टेशन चे कर्ज असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. त्यामुळे नापिकी सोबतच कर्ज फेडण्यात येत असलेली असमर्था सुध्दा या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.#Suicide

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने