💻

💻

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार


पोंभूर्णा:- संध्या विलास बावणे वय ३५, रा. वेळवा या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दि.१६ डिसेंबर ला सकाळी ६ वाजता च्या सुमारास घडली. मृतक महिलेला २ मुले असून मुलगा ८ वीत तर मुलगी १२ वीचे शिक्षण घेत आहेत.
सदर महिला पोंभूर्णा रोडकडे सकाळी फिरायला आली असता डॉ.पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ वाघाने हल्ला चढवून ठार केले. महिलेवर हल्ला झाला त्याच वेळी फिरायला आलेल्या मुलांनी आरडाओरड केला मात्र तोपर्यंत वाघाने सदर महिलेला ठार केले होते.
वनविभाग व पोलीस विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत