रितेश-जिनिलिया वाघोबाच्या भेटीला, ताडोबा २ दिवस मुक्कामी, जंगल सफारी अन् बरंच काही! #Chandrapur #tadoba #tadobasafari

Bhairav Diwase

चंद्रपूर:- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण अनेक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. तिकडे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया व्याघ्र दर्शनासाठी मंगळवारी चंद्रपुरातील ताडोबा नॅशनल पार्कात दाखल झाले.
रितेश जिनिलियाने (बुधवार) सकाळी ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन जंगल सफारीला सुरुवात केली. इतर प्राणी दिसले मात्र आजच्या सफारीत रितेश जिनिलियाला वाघाने हुलकावनी दिली. मिस्टर आणि मिसेस देशमुख दोन दिवस ताडोबात मुक्कामी आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांची दोन्ही मुले आणि रितेश जिनिलियाचे दोन खास मित्र आहेत.
ताडोबात हमखास वाघचे दर्शन होते, हा विश्वास पर्यटकांना आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात. अशातच सरत्या वर्ष २०२१ ला निरोप देण्यासाठी आणि २०२२ या वर्षाचं स्वागत करण्यासाठी रितेशने यंदाच्या वर्षी ताडोबाची निवड केली आहे.
मुलगा रियान आणि राहिल त्याच सोबत दोन मित्रांसह रितेश जिनिलिया व्याघ्र दर्शनाकरिता २८ डिसेंबर रोजी सायंकाळी मुधोलीतल्या लिम्बन रिसोर्ट येथे आले आहेत. आज (बुधवार) ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन सकाळी त्यांनी जंगल सफारी केली. या सफारीदरम्यान त्यांना वाघाने हुलकावनी दिली. मात्र प्राण्यांचे दर्शन झाले.