जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला ठोकल्या बेड्या #arrested

यवतमाळ:- सुनेला सासरी परत नेण्याच्या बहाण्याने वणीत आलेल्या एका व्यक्तीने सुनेवर अत्याचार केल्याची किळसवाणी घटना येथे घडली. घृणास्पद कृत्य करून फरार झालेल्या सासऱ्याला सोमवारी वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात जाऊन बेड्या ठोकल्या.
सन २०१६ मध्ये वणीतील पीडित महिलेचे लग्न चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावातील तरुणासोबत झाले होते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसाठी ती वणी येथे आपल्या आईवडिलांकडे आली. तेव्हापासून ती येथेच होती. दरम्यान, ६ जानेवारीला तिचा सासरा तिला घेण्यासाठी वणीत आला. ७ जानेवारीला पीडितेची आई व वडील बाहेर गेल्यानंतर पीडिता घरी एकटीच होती.
नेमकी हीच संधी साधून विकृत प्रवृत्तीच्या सासऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. याचवेळी पीडितेची आई आली. समोरचे दृश्य पाहून पीडितेच्या आईला धक्काच बसला. यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी सासऱ्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत