सिंदेवाही:- तालुक्यातील वासेरा येथील तंटामुक्त समितीच्या माध्यमातून विजातीय प्रेमी युगलाचा विवाह तंटामुक्त समितीच्या उपस्थिती आज दिनांक ११/०१/२०२२ ला वासेरा येथील आयु,संगरत्न बंडू बन्सोड वय 23 वर्ष वासेरा या मुलीचे व अनुराधा शरद टिंगसले ता. मूल जिल्हा चंद्रपुर येथील वय 19 वर्ष या मुलीसोबत गेल्या काही वर्षात प्रेम असल्यामुळे मुलीने थेट मुलाचे गावी वासेरा ता. सिंदेवाही येथे आज प्रेमी युगलाने लग्न करण्याचे ठरविले.
त्यानुसार त्यांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक बोरकर व सुनीलदत्त घाटे सचिव, देवेंद्र तलांडे पोलीस पाटील व समितीचे सर्व सदस्य यांच्याकडे लग्न लावून देण्यास विनंती अर्ज करुन वयाचे कागदपत्रे सादर केले. त्यानुसार दोघेही लग्नायोग्य असून वयाने पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांचे बौद्ध धर्माच्या रितिरिवाजानुसार लग्न लावण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी नविन जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिला. यावेळी गावकरी उपस्थित होते.
प्रेमीयुवक अडकले विवाहबंधनात #lovemarriage
Reviewed by Bhairav Diwase
on
मंगळवार, जानेवारी ११, २०२२
Rating: 5
(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......
सन्मानचिन्ह
आधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..
आधार न्यूज नेटवर्क Official Youtube
नियुक्ती
चंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत