चंद्रपूर:- घुग्घुस येथील वार्ड क्र ६ मधील संजय गावंडे यांची मुलगी टिना वय १८ हिने काल सांयकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी चंद्रपूर ला पाठविला.आज दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला.
क्रांती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी सदर मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात दुःख व्यक्त करीत आत्महत्या च्या मागे नेमके कारण काय? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सर्वसाधारण स्थरावरून होत आहे.