Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बॉटनिकल असोसिएशन 2021- 22 चे उद्घाटन थाटात संपन्न #pombhurna


पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बॉटनिकल असोसिएशन 2021- 22 चा उद्घाटन कार्यक्रम 25 फरवरी 2022 रोज शुक्रवारला आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन वाडेकर वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख नेवजबाई हितकरिनी महाविद्यालय ब्रह्मपुरी आणि डॉ. अमित सेटीया कंजर्वेशन प्रोग्राम मॅनेजर गडचिरोली हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजीव वेगीनवार हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे बाटनिकल असोशिएशन च्या ह्या वर्षीचे अध्यक्ष कुमारी शीतल उडान ह्या उपस्थित होते.डॉ. मोहन वाडेकर सर यांनी महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाच्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अभ्यासक्रमावर सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर डॉ. अमित सेटीया यांनी जैवविविधतेचा अभ्यास कसा करायचा यावर मार्गदर्शन केले. डॉ. वेगीनवार सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधे मनोगत व्यक्त केले. कन्व्हेनर डॉ. सुप्रिया वाघमारे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख चिंतामणी कॉलेज आॕफ सायन्स पोंभूर्णा यांनी बॉटनिकल सोसायटी स्थापन करण्या मागील उद्देश विद्यार्थ्यांना सांगितले आणि त्याचे मंडळ गठित केले. 
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. सुप्रिया वाघमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन कुमारी श्रुती कोहळे हिने केले तर आभार दिव्या कस्तुरे हिने मानले. त्याच प्रमाणे कु. अवंती मानकर आणि कु. इशा रामटेके यांनी कार्यक्रमातून मिळालेल्या माहीतीवर आपली प्रतिक्रिया दिली आणि कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादावर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने