Top News

प्रयोगशाळा उपकरण आणि साधन" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण #pombhurna

पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे रसायनशास्त्र विभागातर्फे दिनांक २३ मार्च २०२२ ला "प्रयोगशाळा उपकरण आणि साधन" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरविंद चिडे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सोनापूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर हुंगे विभाग प्रमुख रसायनशास्त्र, श्री सतीश पिसे हे उपस्थित होते.

जगावरती आलेल्या कोरोना ह्या संसर्गजन्य रोग तथा जागतिक महामारिमुळे महाविद्यालये सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांसाठी बंद होती त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील साहीत्याची माहिती व्हावी ह्या उद्देशानी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहूणे श्री. चिडे सर यांनी प्राथमिक शिक्षणाचे महत्व व विद्यार्थ्यांमध्ये असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन यावर आपले विचार मांडले.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. सुधीर हुंगे सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतांना विज्ञानामध्ये रसायन शास्त्राचे महत्त्व पटवून सांगितले. श्री. सतिष पिसे सर यांनी विद्यार्थ्यां समोर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणातून प्रयोग शाळेमध्ये वापरले जाणारे उपकरण व साधने यांची सखोल माहिती प्रा. चंद्रकांत वासेकर सर यांनी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी रसायनशास्त्र विभागातील प्रा. वर्षा शेवटे, प्रा. सरोज यादव, डॉ. बालाजी कल्याणकर सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वर्षा शेवटे यांनी केले तर कार्यक्रमात आभार डॉ. बाळासाहेब कल्याणकर सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचप्रमाणे विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने