Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे लक्षवेध पदवी वितरण समारंभ संपन्न #pombhurna


पोंभुर्णा:- आज दिनांक १९ एप्रिल २०२२ ला चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा येथे 9 वा पदवी वितरण समारंभ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. संघपाल नारनवरे हे होते तर उद्घाटक म्हणून डॉ. परमानंद बावनकुळे सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, तसेच प्रमुख पाहुणे आशिष कावटवार गटनेता नगरपंचायत पोंभुर्णा म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने तसेच विद्यापीठ गीताने झाली. डॉ. पुर्णिमा मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. डॉ. नारनवरे, डॉ. बावनकुळे, आशिष कावटवार यांचे शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


पदवीधर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे व उत्तरदायीत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जपली पाहिजे, विद्यार्थ्यांनी पदवीधर झाल्यावर आपल्या समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन आशिष कावटवार यांनी केले.

डॉ. बावनकुळे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ. नारनवरे सरांनी अध्यक्षीय भाषण केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्यात. कार्यक्रमाचे संचालन युवराज सिडाम, साक्षी बुरांडे यांनी केले प्रास्ताविक प्रा. डॉ. पुर्णिमा मेश्राम तर आभार प्रा. डॉ. ओमप्रकाश सोनोने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी महाविद्यालयाचा प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने