Top News

भद्रावती येथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर संपन्न #bhadrawati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भारतीय संस्कृतीमधील महानतम विचार मुल्ये आजच्या पिढीमध्ये रूजवुन बाल-तरुणांची मने सुसंस्कार युक्त घडावी व धर्म, समाज तसेच राष्ट्रकार्यात त्यांची योगदानाची भूमिका लक्षात घेता भद्रावती येथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती भद्रावतीचे वतीने भक्त निवास गणेश मंदिर गवराळा येथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर नुकतेच संपन्न झाले.
शिबिरात १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत या संस्कार यज्ञातून सुसंस्काराचे धडे घेतले. दहा दिवस चाललेल्या या अनिवासी शिबिराची सुरुवात दररोज पहाटे ५.३० वाजता सामुदायिक ध्यानाने होऊन यानंतर सूर्यदर्शन, योगासने, मल्लखांब, कराटे, लाठीकाठी, बौद्धिक तासिका, संगीत वर्ग, गटचर्चा, टाळ - पदन्यास, ओळख सुंदर जीवनाची तसेच सामुदायिक प्रार्थनेने शेवट होऊन पुढील दिनचर्येकरीता विद्यार्थ्यांना स्वगृही पाठविल्या जात होते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सांगितलेले ग्रामगीतोक्त जीवन शिक्षण विद्यार्थ्यांना देत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबापर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून झाला हीच शिबिराची फलश्रुती ठरली.


१० दिवस चाललेल्या या अनिवासी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात 'गुरुदेव हमारा प्यारा' या संकल्प गीताने होऊन अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरात दिलेल्या प्रशिक्षणाचे कार्यक्रमाप्रसंगी प्रात्यक्षिके सादर केली. यात प्रामुख्याने भजन, श्लोक, श्रीमद्भागवतगीता संथा, योगासने, लाठीकाठी, कराटे, मल्लखांब, पदन्यास तसेच शिबिरा विषयी आपले मनोगत व्यक्त केले. श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती, दास टेकडी मोझरी चे संचालक तसेच श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे प्रणेते आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिक दानव, तर प्रमुख पाहुणे म्हणून केशवानंद मेश्राम, चंद्रकांत गुंडावार, प्रवीण आडेकर व सौ. रेखाताई कुटेमाटे उपस्थित होत्या.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबीर प्रमुख गुणवंत कुत्तरमारे व मनोज महाराज चौबे यांनी केले. संचालन विवेक महाकाळकर यांनी, तर आभार प्रदर्शन विशाल गावंडे यांनी केले.
      कार्यक्रमाप्रसंगी श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराच्या स्थायी निधी योजनेत शहरातील एका दानशूर व्यक्तीनी गुप्तदानाद्वारे ५१,१११ रुपयाचा निधी  तसेच गजानन डंभारे, गजानन ढेंगळे, विवेक महाकाळकर, केशवानंद मेश्राम, उल्हासजी भास्करवार यांनी १० हजार रुपयाचे धनादेश समितीकडे सुपूर्द केले. 
दररोज पहाटे ५.३० वाजता होणाऱ्या सामुदायिक ध्यान व सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेप्रसंगी संपूर्ण विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची उपस्थिती शिबीराचे विशेष आकर्षण ठरले.   
      कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मधुकरराव बांदुरकर, मुरलीधर मेश्राम, बाबाराव तेलरांधे, झनक चौधरी, रविश मुरकुटे, क्षितिज शिवरकर, पुरुषोत्तम देठे, नरेंद्र मेश्राम, विनोद रासेकर, भुजंगराव खानोरकर, कालिदास चेडे, अशोक गौरकर, नितीन खैरकार, राजू पोलोजवार, बाबाराव नागोसे, किरण रणदिवे, ओमप्रकाश पांडे, शोभाताई खडसे, सुवर्णाताई पिंपळकर, उर्मिला  बोंडे, आशाताई शेंडे, मनोरमा ढेंगळे, तेजस्विनी डंभारे, सुषमा महाकाळकर, समृद्धी खैरकर, मंदाताई उपगन्लावार, जिजाबाई धाबेकर, मंदाताई पोईनकर, मालाताई आसुटकर, जिजाबाई देठे तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे  कार्यकर्त्यांनी  परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने