उत्कृष्ट राष्ट्रीय हरीत सेना शाळा म्हणून आदर्श हायस्कुल सन्मानीत.

मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त येथे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव.


राजुरा:-  बाल विद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना इको क्लब च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण पूरक व पर्यावरण संवर्धनाचे कार्य, नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. 


वृक्ष लागवड व जनजागृती यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल उत्कृष्ट राष्ट्रीय हरित सेना शाळा म्हणून आदर्श हायस्कुल, राजुरा शाळेचा सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर तर्फे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गुणगौरव करण्यात आला. प्रकाश लोणकर, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बादल नीलकंठ बेले,राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख आदर्श शाळा , विलास कुंदोजवार, वनपाल, सामाजिक वनिकरण, परीक्षेत्र राजुरा, विध्यार्थी प्रमुख सरिता लोहबडे, सावी येसेकर, तेजस मोहितकर, तसेच संतोष देरकर,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था व सामाजिक वनिकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी आदर्श शाळेच्या वतीने प्रकाश लोणकर यांना पक्षांचे बर्ड फिडर व पाण्याचे प्याऊ भेट देण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपुर मार्फत उत्कृष्ट कार्याबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल बाल विद्या शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे,  उपाध्यक्ष मनोहरराव साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, सहसचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक लक्ष्मणराव खडसे, मधुकरराव जानवे, अविनाश निवलकर,  मंगला माकोडे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आदर्श प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका नलिनी पिंगे आदींसह शाळेतील सर्व शिक्षक व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय हरित सेने तर्फे अनेक नवोपक्रम राबवले जातात. गांडूळ खत निर्मिती, वृक्ष रक्षाबंधन , पर्यावरण पूरक होळी, दीपोत्सव, जागतिक पर्यावरण दिन, वन्यजीव सप्ताह, सायकल रॅलीचे आयोजन, प्लास्टिक बंदी जनजागृती, पाणथळ्यास भेट, पक्षांकरीता खाऊप्याऊ योजना, विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून विविध संदेश देणे असे शेकडो उपक्रम नित्यनेमाने राबविण्यात येतात. यामध्ये विध्यार्थी उत्सपूर्तपणे सहभाग घेत असून पालक वर्ग नेहमी सहकार्य करतात.
----------------------------------------------
 आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रमांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मिळालेल्या या पुरस्कारामुळे पर्यावरण जनजागृतीच्या कार्याची आणखी जबाबदारी वाढली असून भविष्यातही आम्हची शाळा विध्यार्थीच्या सहकार्याने हे पवित्रकार्य करीत राहिल तसेच सामाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असून त्यांनी आम्हच्या शाळेच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी म्हटले आहे.
---------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत