Top News

ठाकूर कुटुंबाला आ. मुनगंटीवारांचा मदतीचा "आधार" #gondpipari #Adhar


गोंडपिपरी:- तालुक्यातील चेकलिखीतवाड्यात शॉर्ट शर्किट मुळे आग लागल्याची घटना आज दि. २ मे सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली घडली.
चेकलिखीतवाडा येथील बाबुराव ठाकूर, सुभाष बाबुराव ठाकूर, अमित बाबुराव ठाकूर तीन कुटुंबियांचे पूर्ण घर आगीत जळून खाक झाल या आगीत १० क्विंटल धान, जीवनावश्यक वस्तू सह ८० हजार रुपये रोख रक्कम, तुरी, अनाज सह सर्व घरातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजी ५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गावातील नागरिकांनी एकत्र येत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोंभुर्णा अग्निशामक दलाचे वाहन देखील पोहचले.

यावेळी तहसीलदार के डी मेश्राम, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय मोगरे, शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार, हरिदास मडावी, नितेश मेश्राम, संदिप पौरकार, कोमल फरकडे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे.
या घटनेची तात्काळ दखल घेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याच सांत्वन म्हणून आमदार श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना गावातील भाजपचे सक्रिय सदस्या सौ कोमल ताई फरकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा जिल्हा महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा कु. अल्का ताई आत्राम यांच्या हस्ते ठाकूर कुटूंबियांना मदत देण्यात आली
यावेळी बबन निकोडे ता अध्यक्ष गोंडपिपरी, गणपत चौधरी जेष्ठ नेते , विनोद देशमुख माजी उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा, भूमिका पिपरे, कोमल फरकडे सदस्य चेक लिखितवाडा, संदीप पौरकर सदस्य ग्राम पंचायत वढोली, प्रवीण पिपरे, सुनिल फरकडे, देवराव राऊत, डॉ धदरे व अनेक गावकरी होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने